धनाचे फार मोठे सार्मथ्य असते असा बहुतेकांचा समज असतो. त्यामुळे धनसंचयाच्या मागे लोक असतात. धडपड करायची ती त्यासाठी. यात फारसे गैर आहे असे नाही. पण धनामुळे, संपत्तीमुळे आपण काहीही करू शकतो, काहीही मिळवू शकतो, आपणास कोणावरही अवलंबून राहावे लागत नाही, आपले कोणीही काही बिघडवू शकत नाही, अशा विचारात असणे मात्र अहितकारक ठरू शकते.
↧